शिक्षण, उद्योजकता, कौशल्यविकास, निवारा आणि सामाजिक सुरक्षा — सर्व योजना एकाच ठिकाणी.
महाराष्ट्र शासनाने दिनांक 8 फेब्रुवारी, 1984 रोजी कंपनी अधिनियम कायदा,1956 नुसार समाजातील दारिद्र्य रेषेखाली जीवनमान जगणा-या विमुक्त जाती व भटक्या जमातींच्या लोकांचा विकास करण्याच्या दृष्टीने महामंडळाची स्थापना केली आहे. दि - 13 जुलै, 1999 नुसार विशेष मागास प्रवर्गातील जातींना कर्ज पुरवठा करण्याकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळास प्राधिकृत वाहिनी म्हणून शासनाने मान्यता दिली आहे.