वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना
अर्जदाराची अर्हता:
- अर्जदार महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- अर्जदार विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
- अर्जदाराचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील.
- लाभार्थ्यांचे वय वर्ष १८ ते ५० दरम्यान असावे
- अर्जदाराने अर्ज करतेवेळी या प्रकल्पासाठी व यापुर्वी महामंडळाच्या किंवा इतर महामंडळाच्या कोणत्याही योजनाचा लाभ घेतलेला नसावा.
- कुटुंबातील एकावेळी एकाच सदस्याला कर्ज योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:
- शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- बँक स्टेटमेंट
- प्रकल्प अहवाल
गट कर्ज व्याज परतावा योजना
अर्जदाराची अर्हता:
- गटातील सदस्य हे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत.
- गटातील सदस्य हे विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावेत.
- गटातील लाभार्थ्यांचे कर्ज खाते आधारकार्ड लिंक असणे अनिवार्य राहील
- गटातील लाभार्थ्यांचे वय वर्ष १८ ते ४५ दरम्यान असावे
अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचा तपशिल:
- शिधापत्रिकेची प्रमाणित प्रत
- आधार कार्ड
- जातीचे प्रमाणपत्र
- पत्त्याचा पुरावा
- बँक स्टेटमेंट
- प्रकल्प अहवाल